मुरबाडमध्ये शाखा आभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

सरळगांव,दि.१(वार्ताहर)-मुरबाड पंचायत समिती बांधकाम विभागाच्या एका शाखा अभियांत्याला २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडल्याने शासकीय कार्यालयात खळबळ माजली आहे. मुरबाड तालुक्यातील व्यापारी मानिवली या गावात ग्रामपंचायतीच्या एका कॉक्रीटीकरण रस्त्याचे बिल काढण्यासाठी विलास व्यापारी यांच्याकडे पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विठ्ठल धात्रक यांनी २५ हजारांची लाच मागितली होती. अशा अधिकार्‍यांना धडा शिकवला पाहिजे म्हणून व्यापारी यांनी ही माहिती लाचलूचपत विभागाला दिली. या माहितीवरून या विभागाचे डी. वाय. एस.पी.बाळकृष्ण सांवंत यानी मुरबाड येथील पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला. या सापळ्यात शाखा अभियंता धात्रक हे लाच घेताना रंगेहात पडले गेले.

सरलगाव