महोत्सवातूनच उत्तम खेळाडू घडतात -आ. शांताराम मोरे

अनगांव,दि.३१(वार्ताहर)-उत्तम आणि दर्जेदार खेळाडू हा खर्‍या अर्थाने विविध कला, क्रीडा महोत्सवामधूनच घडत असतात. या घडलेल्या खेळाडूंवर तसे संस्कार झाल्याने आपल्या खेळाविषयी ठाम विेशास निर्माण होऊन एक सक्षम खेळाडू तयार होतो, असे मत भिवंडी ग्रामीण मतदार संघाचे आमदार शांताराम मोरे यांनी व्यक्त केले. राजू भाऊ ग्रुप व श्रीगणेश मित्रमंडळ, मराडेपाडा या मंडळाच्या वतीने क्रिकेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार शांताराम मोरे म्हणाले की, क्रीडाक्षेत्रात नाव मोठे करण्याची खूप मोठी संधी आहे. क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून आपण क्रीडागुणांना अधिकाधिक सक्षमतेने, मेहनतीने घडवून स्वतःसोबतच तालुक्याचे व देशाचे नावलौकिक करावे, असे आवाहन त्यांनी केले. तर शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे यांनी सांगितले की, या खेळामुळे आरोग्य उत्तम राहते. क्रिकेट खेळाबरोबरच इतर खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन करीत राजुभाऊ चौधरी यांनी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून तरुणांच्या कलागुणांना एक नवी संधी मिळवून दिली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी प्रथम क्रमांक कांदळी संघ, द्वितीय विजेता नांदीठणे संघ, तृतीय विजेता कवाड संघास शिवसेना आमदार रुपेश म्हात्रे, शिवसेना तालुकाप्रमुख विेशास थळे, प्रणव धनावडे, हास्यसम्राट जॉनी रावत, निलेश सांबरे, मजूर ङ्गेडरेशनचे संचालक पुंडलिक पाटील यांच्या हस्ते चषक देण्यात आले. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष दिना पाटील, युवराज पाटील, विशुभाऊ म्हात्रे, राहुल पाटील, अविनाश राऊत, सुनिल वायले, रविंद्र चंदे, दशरथ पाटील, किशोर जाधव, अनंता शेलार, संजय पाटील, रत्नाकर पाटील, रघुनाथ पांढरे, नितीन जोशी, तानाजी मोरे, किशोर जाधव, रविकांत पाटील, गणेश पाटील, एकनाथ पाटील, नामदेव पवार, सुनिल चौधरी, भरत शेलार, प्रशांत पाटील, दिनेश भोईर, रघुनाथ पांढरे, योगेश दळवी, प्रकाश पाटील, भानुदास भोईर, संदीप ठाकरे, शैलेष मांजरेकर, भगवान लकडे, कल्पेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवसेना शाखा मराडेपाडा शाखेचे उद्घाटन व मंदिराचं भुमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रिकेटच्या महासंग्रामाचे आयोजन करणारे सामाजिक कार्यकर्ते राजु भाऊ चौधरी व श्रीकांत गायकर यांना आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

अनगाव