महिलांना शौचालयाची मोङ्गत सुविधा द्या; कडोंमपा आयुक्तांना निवेदन

कसारा,दि.१५(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये म्हणजे अत्यंत गजबजलेल्या या शहरांमध्ये स्त्रियांसाठी ठिकठिकाणी विशेष करून स्थानक परिसरात, शौचालयांची मोङ्गत सेवा उपलब्ध व्हावी यासाठी रिपाइं ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा आणि महिलामुक्ती ङ्गाऊंडेशनच्या सर्वेसर्वा अपेक्षा दळवी आणि त्यांच्या सहकारी पदाधिकार्‍यांनी नुकतेच कडोंमपा आयुक्तांना लेखी निवेदन देऊन समस्या निराकरण करण्याची आग्रही मागणी केली आहे. महानगरपालिका हद्दीत पुरुषांना मोङ्गत शौचालयाची व्यवस्था, मात्र महिलावर्गाकडून शौचालयासाठी शुल्क आकारणी केली जाते, असा आरोप अपेक्षा दळवी यांनी निवेदनामध्ये व्यक्त केला आहे. निवेदन देतेसमयी त्यांच्यासह हर्षदा भानुशाली, केशर ङ्गुलपगार, लीना शिरसाठ, विमल वानखेडे, वनिता मोरे, रेखा वानखेडे, प्रियांका गायकवाड (कसारा शहराध्यक्षा), पत्रकार मिलिंद वानखेडे आदी उपस्थित होते.

कसारा