भारिपमध्ये युवकांच्या प्रवेशाचा ओघ सुरूच

कसारा,दि.२३(वार्ताहर)-राष्ट्रीय नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या कणखर नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसारा भारिप बहुजन महासंघ शाखेत अलीकडे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात प्रविष्ट होत आहे. नुकतेच कसारा शहराध्यक्ष गोपीचंद शेजवळ यांच्या जन्मदिनी बहुजन समाजातील अनेक तरुणांनी पक्षप्रवेश केला. यामध्ये राहुल मोरे, निलेश उबाळे, गणेश रेरे, निलेश भडांगे, केशव खाडे, निलेश खाडे, राजेश भवारी, प्रदीप शिंदे, भास्कर उबाळे, राजू भाकरे, प्रीतम गवळे, संभाजी रोकडे आदींसह नवनिर्वाचित कार्याध्यक्ष संदीप सोनावणे आदींचा समावेश आहे. या पक्षप्रवेश समारंभावेळी ज्येष्ठ नेते सुहास जगताप, बाळासाहेब रुपवते, गोरख वाघमारे, बाबुराव शेजवळ, दिनेश घनघाव, शरीङ्ग खान पठाण, वसंत भगत, युवा अध्यक्ष कुणाल गांगुर्डे, नवाझ सारंग व इतर सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.

कसारा