प्रजासत्ताकदिनानिमित्त मनसेकडून शूजवाटप

आसनगांव,दि.२७(वार्ताहर)-प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून शहापूर तालुका जनहित कक्ष तालुका संघटक शशी पुरभे यांच्या वाढदिवसानिमित्त वासिंद येथील संत गाडगे महाराज अश्रम शाळेच्या वसतिगृहात आदिवासी मुलांकरीता शूज वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी मनसेचे पदाधिकारी व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून मनसे जनहित कक्षाचे तालुका संघटक शशी पुरभे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वासिंद येथील गाडगे महाराज आश्रम शाळेतील १६० विद्यार्थांना पायातील शूजचे वाटप करून अन्नदान केले. त्याप्रसंगी शहापूर मनसे तालुका अध्यक्ष जयवंत मांजे, जनहित कक्ष जिल्हासंघटक साईनाथ कदम, मनविसे तालुका उध्यक्ष विजय भेरे, मनविसे उपाध्यक्ष प्रशांत गडगे, नरेश पाटील, रोजगार स्वयं रोजगार विभाग जिल्हा सचिव राकेश बोराडे, रो.स्व.तालुका संघटक योगेश मलबारी, उपतालुका अध्यक्ष आमोल बोराडे, संस्थेचे संचालक विजय साठे, मुख्याधापक गायकर, वासिंद शहर शाखेचे शहर अध्यक्ष संजय सुरळके, सुजान वडके, चेतन भोसले, नितीन चंदे इ.मान्यवर उपस्थित होते.

आसनगाव