पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर कसार्‍यात २ एप्रिलला

कसारा,दि.३०(वार्ताहर)-‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्याचे जतन करण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी पोलीस सेवेकडे वळावे आणि पोलीस भरतीसाठी शारीरिक तंदुरुस्तीप्रमाणेच कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे यासंबंधी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी कसारा पोलीस स्टेशनच्या वतीने २ एप्रिल रोजी एका शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून कळविण्यात आले आहे. येथील सुप्रसिद्ध डॉ.मनोज शेटे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर हे शिबीर होणार असून यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. त्याकरिता या करिअर उपयोगी पोलीस भरती मार्गदर्शन शिबिराचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कसारा पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी, सहा.पो.निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे यांनी केले आहे.

कसारा