पॅनकार्ड शिबीर आणि शैक्षणिक साहित्यवाटप उत्साहात

किन्हवली,दि.२३(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील टेंभरे गावातील मित्र सन्मान प्रतिष्ठान, समाजकल्याण न्यास व संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पॅनकार्ड शिबीर व जिल्हा परिषद शाळा, टेंभरे येथील एकूण ६० शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण न्यासचे डॉ.सोन्या पाटील तर उद्घाटन राष्ट्रवादीचे युवा नेते निखिल बरोरा, समाजकल्याण न्यासचे प्रदेशाध्यक्ष अनिल घोडविंदे, शहापुर तालुकाध्यक्ष किसन जाधव, खरेदी-विक्री संघाचे संचालक विनायक सापळे, संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार योगेश हजारे, उपजिल्हा रुग्णालय कमिटी सदस्य रवींद्र मडके, जयेश भालके, रुपेश साबळे यांच्यासह गावातील सरपंच, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किन्हवली