नगरसेवक संतोष तरे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

टिटवाळा,दि.२१(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्र.१० (गणेश मंदिर) चे नगरसेवक संतोष काशिनाथ तरे यांनी आपल्या विभागात विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचे आयोजन केले होते. उन्हाळ्याची सुट्टी संपून जून महिन्यात सर्व शाळा सुरु झाल्या. विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश घेतला तर काही विद्यार्थी पास होऊन वरील वर्गात गेले. टिटवाळा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक संतोष तरे यांनी आपल्या प्रभागातील पालकांची वह्यां खरेदी करण्याच्या बाबतची समस्या सोडविली आहे. प्रभाग क्र. १० च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी, वह्या व लॉंग रजिस्टर मोफत वाटप केले आहेत. गणेश मंदिराजवळील आपल्या कार्यालयाजवळ सुमारे ४०० शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६ मोफत वह्या व रजिस्टरचे वाटप केले. व अजूनही कोणी विद्यार्थी वा विद्यार्थिनी वह्या व लॉंग रजिस्टर पासून वंचित राहू नये म्हणून पुन्हा मोफत वाटप करणार असल्याचे, नगरसेवक संतोष तरे यांनी ठाणेवैभवशी बोलतांना सांगितले. या उपक्रमाचा शेकडो गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेतला यावेळी विभागीय अध्यक्ष मोरेेशर (अण्णा) तरे, उद्योजक आनंद जाधव, नितीन वाघमारे, मुस्तफा सय्यद, जमाल शेख, दिपेश तरे, सुभाष आहिरे, कचरू वाघमारे, भरत बेडसे, श्रवण गौड, विजय वाघमारे, अमित तरे, निलेश डोंगरे, आनंद भालके, दिलीप तरे, स्नेहल खिसमतराव, पप्पू देसले, मोहन तरे, तुकाराम वाघमारे, प्रसाद दलाल व इतर सर्व राष्ट्रवादी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिटवाळा