टिटवाळ्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

टिटवाळा,दि.२२(वार्ताहर)-टिटवाळयातील भारतीय जनता पार्टीने टिटवाळा येथे गणेश मंदिर भागात, ठाणे-पालघर जिल्हा विभागीय सरचिटणीस व संपर्क प्रमुख (ग्रामीण) राजाभाऊ पातकर यांनी योग दिनाचे आयोजन केले, तर टिटवाळा-मांडा प्रभाग क्र.९ मध्ये नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी योग दिन आयोजित केला होता. आपले आरोग्य निरोगी व सुदृढ रहावे यासाठी योगासन करणे हे
उपयुक्त आहे. असे सांगून प्रशिक्षकांनी के एन टी स्कूल टिटवाळा येथे सकाळ सत्रातील विद्यार्थी - विद्यार्थिनी व उपस्थित मान्यवरांनी योगासने करून शरीर निरोगी ठेवण्याचा संदेश दिला. तसेच हनुमान मंदिर, विद्यामंदिर शाळा मांडा (पू.), राजाभाऊ पातकर जनसंपर्क कार्यालय, विठ्ठल मंदिर टिटवाळा येथे पतंजली योग प्रशिक्षण केंद्र, मांडा-टिटवाळा यांच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने, गणेश विद्यालय येथील विद्यार्थ्यांना योगासने शिकविण्यात आली. व योगासनां विषयी माहितीही देण्यात आली. सलग तीन वर्षांपासून भाजपा नेते राजाभाऊ पातकर यांच्या सहकार्याने टिटवाळयात जागतिक योग दिन साजरा होत असतो. या योगशिबिरात त्यांनी स्वतः योगासने करून सहभाग घेतला. नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी प्रशिक्षकांसोबत भाग घेऊन योगासनांचे प्रशिक्षण दिले. योग दिनाचे औचित्य साधून दहावीत सर्व शाळेतून प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भाजप नेते राजाभाऊ पातकर व नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी यावेळी केला. शक्तीवान भोईर, किरण रोठे, अमोल केदार, वैभव पुजारी, अशोक चौरे,प्रमोद नांदगावकर, पतंजली योग केंद्राचे कार्यकर्ते, परिसरातील नागरिक यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

टिटवाळा