जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धेत शहापूरचे सुयश

शेंद्रुण,दि.५(वार्ताहर)-जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे आयोजित केल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धेत शहापूर तालुक्याने सुयश मिळविले. क्रिकेट, कबड्डी, लंगडी, कॅरम, बुद्धिबळ या स्पर्धेत प्रथम क्रमांकाने शहापूर तालुका विजेता ठरला. लंगडी स्पर्धेत शहापूर संघाचे कर्णधारपद भाग्यश्री मडके, क्रिकेट स्पर्धेत शहापूर संघाचे कर्णधारपद सचिन निचिते, तर कबड्डी स्पर्धेत पुरुष संघाचे कर्णधारपद रमेश शिरोसे, महिला संघाचे कर्णधारपद आिेशनी बोराडे यांनी भूषविले. बुद्धिबळ स्पर्धेत निकिता गोस्वामी, १०० मी.धावणे स्पर्धेत पुरुष गटात राजेश मडके तर महिला गटात आिेशनी बोराडे, ५० मी.तीन पायांची स्पर्धेत पुरुष गटात अरुण मडके, पांडुरंग महालुंगे तर महिला गटात धनश्री बांगर, प्रतिभा पगारे यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. यावेळी सर्व विजेत्या खेळाडूंना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर निंबाळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान करुण गौरविण्यात आले. शहापूर तालुका जि.प.कर्मचारी संघाने मिळविलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रवीण भावसार, गटशिक्षणाधिकारी आशिष झुंझारराव, स्वाभिमान शिक्षक संघटनेचे काशिनाथ भोईर, महाराष्ट्र शिक्षक सेनेचे चिंतामण वेखंडे, प्राथमिक शिक्षक परिषदेचे भरत मडके यांनी त्यांचे कौतुक केले.

शेंद्रुण