जागतिक महिलादिनी कु. पुजा हिंदुराव पंचरत्न पुरस्कार

सरळगांव,दि.९(वार्ताहर)-८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन मुरबाड नगरपंचायतने पंचरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुरबाड नगरपंचायतची स्थापना २०१५ साली झाली होती. मुरबाड तालुक्याचे आमदार व नगरपंचायतचे प्रेरणास्थान किसन कथोरे व महिला व बालकल्याण समिती सभापती यांच्या सौजन्याने महिला सक्षमीकरणारे एक पाऊल पुढे या हेतूने आपण आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करीत आहात. याबाबतची कृतज्ञता म्हणून जागतिक महिला दिनाचे औचित्याने कु. पुजा दिलीप हिंदूराव यांना कलारंग-पंचपत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम आमदार किसन कथोरे, मुरबाड न. पंचायत मुख्याधिकारी विजय तळेकर, वैभव भोसले- नगराध्यक्ष मुरबाड, नारायण गोंधळी- उपनगराध्यक्ष मुरबाड, मोहन सासे बा. सभापती, किसन कथोरे नगरसेवक व मुरबाड नगरपंचायतचे नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.

सरलगाव