जनहिताच्या आदर करून चक्का जाम आंदोलन स्थगित

खर्डी,दि.३१(वार्ताहर)-सकल मराठा समाजाने मराठा मागण्यासाठी जाहीर केलेला ३१ जानेवारी रोजी होणारा चक्का जाम आंदोलन शहापूरातील मराठा समाजबांधवांच्या वतीने पार्थसारथी पंप आसनगाव स्टेशन रोड येथे आयोजित केला होता. मंगळवार कार्यालयीन दिवस असल्याने विविध चाकरमानी प्रवासी, विद्यार्थी, महिला तसेच माघी गणेशोत्सवाची स्थापना या सर्वांचा विचार करून जनतेचे हाल व गैरसोय होऊ नये म्हणून चक्का जाम आंदोलन स्थगित केले आहे, असे प्रसिध्दीप्रमुख शामकांत पतंगराव यांनी सांगितले आहे.

खर्डी