गजानन भोईर यांना मातृशोक

शेंद्रुण,दि.१८(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील टेंभरे येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते गजानन भोईर यांच्या मातोश्री अनुसया दत्तात्रय भोईर (८५) यांचे वृद्धापकाळाने १५ नोव्हेंबरला निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार असून त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

शेंद्रुण