खर्डीत प्रजासत्ताकदिन उत्साहात

खर्डी,दि.२७(वार्ताहर)-प्रजासत्ताकदिनानिमित्त खर्डीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खडीं माध्यमिक शाळेतील विध्यार्थ्यानी बाजारपेठेत प्रभातङ्गेरीचे आयोजन केले होते. खडीं ग्रामपंचायत कार्यालयात पोलीस पाटील शाम परदेशी, माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, खर्डी पोलीस दूरक्षेत्रात पी.एस.आय. दत्तात्रय खोकराळे यांनी झेंडा ङ्गडकाविला. यावेळी खडीं माध्यमिक विद्यालायतील विद्यार्थीनींनी आदिवासी तारपा नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जि.प.मराठी शाळेत मुख्याध्यापक सुधीर भोईर यानी झेडावंदन केले. तर डॉ.हेडगेवार यांच्या वाचनालय कार्यालयात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन सरपंच भाग्यश्री डिगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सचिन जाधव, विकासक गणेश राऊत, पत्रकार नरेश जाधव, डॉ.कृष्णा सपाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

खर्डी