खर्डीजवळील जंगलात गुराख्माची आत्महत्या

खर्डी,दि.२९(वार्ताहर)-खर्डीतील लक्ष्मण तुकाराम गावित (५५) हा गेल्या पाच-सहा वर्षांपासून धामणी येथील एका शेतकर्‍याकड़े गुरे चरायचे काम करीत होता व त्याला रोज दारू प्यायची सवय होती.२७ ऑगस्टला तो सकाळी जनावरे चरायला घेऊन गेला होता. परंतु तो रात्र झाली तरी घरी न आल्याने सकाळी त्याची शोधशोध केली असता, त्याचा मृतदेह जंगलात एका झाडाला टावेलच्या सहायाने लटकताना दिसला.लक्ष्मणने दारुच्या नशेत गळ्फास घेऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त होत असून ही बातमी समजताच खर्डी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून याप्रकाराबाबत त्याची पत्नी लीला हिचा कोणावरही काहीही संशय नसल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.

खर्डी