खरीवली ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

अस्नोली,दि.२७(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील खरीवली ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व निर्माण केले आहे. तत्पूर्वी बिनविरोध झालेल्या या ग्रामपंचायतीवर सरपंच व उपसरपंच यांचीही निवडणूक बिनविरोध झाली आहे. सरपंचपदी बाळू वाघ तर उपसरपंचपदी मंदा दौलत हरड यांची बिनविरोध निवड झाली आहे. २४ ऑगस्टला निवडणूक झाली होती. ७ पैकी ७ जागा भाजपने शहापूर तालुका अध्यक्ष सुभाष हरड यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या होत्या. बाळू वाघ, मंदा दौलत हरड, सायली साईनाथ हरड, रत्ना दिलीप मुकणे, रामचंद्र हिलम, उषा मुकणे, सचिन उबाळे हे निवडून आले होते. आज सरपंचपदासाठी बाळू वाघ व उपसरपंचपदासाठी मंदा दौलत हरड यांचेच अर्ज आले होते. त्यानुसार दोघे बिनविरोध निवडून आले.

अस्नोली