कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

सरळगाव,दि.१९(वार्ताहर)-मुरबाडच्या म्हसा यात्रेसाठी जात असलेल्या मोटारसायकलस्वारने ट्रकला समोरासमोर धडक दिल्याने एक अठरा वर्षीय तरुण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. सकाळी साडेनऊच्या दरम्यान कल्याणनगर राष्ट्रीय महामार्गावरील नढई या गावाजवळ हा भिषण अपघात झाला. कल्याण, चिंचपाडा येथील राहणारा दिपेश पाचशे व त्याचे अन्य मित्र हे मुरबाडमध्ये सुरू असलेल्या म्हसा यात्रेला सकाळी कल्याणहून निघाले होते, मात्र मुरबाड येथे आल्यावर ते म्हसामार्गे न जाता मार्गभ्रमित झाल्याने ते सरळ टोकावडे मालशेज दिशेने निघाले. मुरबाडपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नढई गावच्या वळणावर समोरून येणार्‍या MH. 43.E.9892 या ट्रकला दिपेशने MH.05. AV. 9743 या मोटरसायकलने धडक दिली. त्या धडकेत तो जागीच ठार झाला तर मागे बसलेला विशाल बारसकर हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी कल्याण येथे हलविण्यात आले आहे.

सरलगाव