आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते २५० विद्यार्थ्यांचा सत्कार

किन्हवली,दि.२७(वार्ताहर)-कुणबी महोत्सव प्रतिष्ठातर्फे शहापूर तालुक्यातील इ.१० वी आणि इ.१२ वीच्या परीक्षेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्रसिद्ध मार्गदर्शकांकडून करियर गाईडन्स शिबिराचे आयोजनही शहापूरमधील वैश्य वाणी हॉल येथे झाले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यास आणि मार्गदर्शन शिबिरास आमदार किसन कथोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कुणबी महोत्सव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र चंदे यांचा वाढदिवस पुस्तक व शालोपयोगी वस्तू वाटप करून साजरा करण्यात आला. आमदार किसन कथोरे, समाज नेते दशरथ तिवरे, कुणबि समाज उन्नति संघ शहापूर तालुका अध्यक्ष किशोर कुडव तसेच शहापूर तालुक्यातील अनेक विविध संघटनांचे सन्माननीय पाहुणे सत्कारमूर्तीं किशोर ठाकरे, ठाणे जिल्हा मुख्य वनसंरक्षक मधूकर फर्डे राजेश विशे सहाय्यक आयुक्त, सेल्स टॅक्स विभाग, नरेंद्र पाटील, सर्वपक्षीय ज्येष्ठ नेते व पदाधिकारी, समाजसेवक आणि सर्व समाज बांधव उपस्थित होते. या वेळी ५० शाळेतील २५० विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

किन्हवली