अस्नोलीत रस्त्याचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

अस्नोली,दि.५(वार्ताहर)-अस्नोलीचे शिवसेना शाखा प्रमुख शिवाजी दिनकर व उपसरपंच कमल शिवाजी दिनकर यांच्या प्रयत्नानाने हनुमान मंदिर ते दत्तात्रय कुशा दिनकर यांच्या घरापर्यंतच्या पेवर ब्लॉक रस्त्याचा भूमिपूजन सोहळा नुकताच ज्येष्ठ नागरिक नारायण हरी दिनकर यांच्या हस्ते झाला. यावेळी मा.जि.सदस्य प्रकाश दिनकर, कालूराम दिनकर, केशव रोकडे, वसंत दिनकर, रामचंद्र निपूर्ते, पत्रकार अंकुश सातपुते यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या चौदावा वित्त आयोगातून हा रस्ता मंजूर झाला असून या रस्त्यासाठी २ लाख ५ हजार रुपये निधी मंजूर आहे.

अस्नोली