अभिनव विद्यालयाचा निकाल १०० टक्के

आसनगांव,दि.२०(वार्ताहर)-छत्रपती शिक्षण संस्था संचलित अभिनव न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल आसनगाव या शाळेचा शालान्त परीक्षा मार्च २०१७ चा निकाल पदार्पणातच १००% लागला आहे. यात ऋग्वेद बाळकृष्ण जागरे याने ९२.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर सोनाली अनिलकुमार यादव हिने ९१.२०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अक्षता रमेश भालेराव हिने ८१.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. यात शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर फर्डे, दीपाली चंदे व सर्व शिक्षकांनी विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तर शाळेचा निकाल १००% लागण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेेशर तळपाडे व सचिव संतोष चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली.

आसनगाव