अंडरआर्म सर्कल क्रिकेट सामन्यांचे आयोजन

अस्नोली,दि.२६(वार्ताहर)-ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जय हो सामाजिक संघटना व आशावादी प्रतिष्ठान, अस्नोलीतर्ङ्गे भव्य अशा अंडरआर्म सर्कल क्रिकेट सामन्यांचे आयोजन ३१ डिसेंबर २०१६ ते २ जानेवारी २०१७ या कालावधीत करण्यात आले आहे. कै. जैतुबाबा भोईर, अस्नोली या मैदानावर हे सामने होणार असून या सामन्यांसाठी प्रथम पारितोषिक म्हणून १११११ रुपये व बोकड आणि चषक तसेच द्वितीय पारितोषिक म्हणून ६६६६ रुपये आणि तीन गावठी कोंबडे व चषक असे पारितोषिक असणार आहे. तसेच उपांत्यपूर्व सामन्यांपासून प्रत्येक खेलाडूस सन्मानपत्र देण्यात येणार असल्याची माहिती जय हो सामजिक संघटनेचे अध्यक्ष कैलास निचिते व आशावादी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास सातपुते यांनी दिली आहे.

अस्नोली