स्पेन: भारताच्या हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताला चौथ पदक मिळवून दिले आहे. भारताने कांस्यपदकाच्या सामन्यात स्पेनचा २-१ अशा फरकाने पराभव करत १४वे ऑलिम्पिक पदक हॉकी संघाने पटकावले आहे. या विजयासह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे.
भारतीय हॉकी संघाच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा भारताने सलग दोनदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. यापूर्वी १९६८ आणि १९७२ च्या ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते. भारताचा गोलकिपर म्हणजेच भारतीय हॉकी संघाची भिंत म्हटल्या जाणाऱ्या श्रीजेशचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता, कांस्यपदकाला गवसणी घालत श्रीजेशच्या कारकीर्दीचा गोड शेवट झाला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा कांस्यपदकासाठी भारत वि स्पेन यांच्यात हॉकी सामना खेळवला गेला. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. पण कोणताच संघ गोल करू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनला पेनल्टी मिळाली आणि त्यांनी गोल करत आघाडी मिळवली. यानंतर ३०व्या मिनिटाला भारताला पेनल्टी मिळाली आणि यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. पण स्पेन गोल करण्यात अपयशी ठरला. यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताकडून हरमनप्रीतने पेनल्टीवर गोल केला. यासह भारताने २-१ अशी आघाडी मिळवली.
स्पेनच्या संघाने पहिल्या क्वार्टरमध्येच पहिला गोल केला. एका छोट्याशा चुकीचा फटका भारतीय संघाला बसला. स्पेनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, त्याचे स्पेनने गोलमध्ये रूपांतर केले. यानंतर दुसरा क्वार्टर संपणार असताना ३० सेकंद आधी भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ज्याचे कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोलमध्ये रूपांतर केले. याच्या काही वेळापूर्वीही भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, त्यावेळी हरमनप्रीत सिंगने कमांड हाती घेतली नव्हती. हरमनने त्यांनी अमित रोहितदासला संधी दिली. मात्र तो गोल होऊ शकला नाही. त्यानंतर हरमनप्रीतने पुनरागमन केले. यासह सामना बरोबरीत राहिला.
तिसरा क्वार्टर सुरू झाला तेव्हा भारतीय संघाने आक्रमक पवित्रा स्वीकारला. १५ मिनिटांनी भारताला पेनल्टीची दुसरी संधी मिळाली. यावेळीही कर्णधार हरमनप्रीतने पुढे येत पेनल्टीवर गोल करण्याची जबाबदारी स्वीकारली. हरमनप्रीतने आणखी एक गोल केला. यासह भारताला आघाडी मिळाली. यानंतर दोन्ही संघ गोल करण्याचा प्रयत्न करत राहिले. पेनल्टी कॉर्नरही मिळाला, पण त्यात यश आले नाही. शेवटची ५ मिनिटे अतिशय मनोरंजक स्पर्धा होती. दोन्ही संघ आक्रमक दिसत असले तरी गोल करण्यात त्यांना यश आले नाही.