कल्याण : डिफरेंटली एबल्ड क्रिकेट कॉउन्सिल ऑफ़ इंडियातर्फे होणाऱ्या आगमी भारत नेपाल टी -20 मालिकेसाठी कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील कोळेगांवच्या रविंद्र संते याची निवड झाली आहे. 3 ते 5 मार्च दरम्यान होणाऱ्या भारत नेपाल मालिकेमध्ये एकूण तीन टी -20 सामने होणार असून भिवानी (हरयाणा) येथे ही मालिका होणार आहे. पालघरच्या विक्रांत केणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार असून नागपुरचा गुरुदास राउत तसेच अकोल्याचा अजय डोंगरे असे महाराष्ट्रातून चार खेळाडू भारतासाठी खेळणार आहेत. सर्व स्तरातुन या सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.