नेदरलँड्स एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला विजय नोंदवू शकेल?

Photo credits: Reuters

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा १९ वा सामना नेदरलँड्स आणि श्रीलंका यांच्यात २१ ऑक्टोबर रोजी लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. १७ ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे दक्षिण आफ्रिकेवर ३८ धावांनी (४३ षटकांचा सामना) शानदार विजय मिळविल्यानंतर नेदरलँड्स आत्मविश्वासाने उंचावत असेल, तर श्रीलंका अजूनही या विश्वचषकातील पॉईंट्स टेबलमध्ये आपले खाते उघडण्याचे मार्ग शोधत आहे. श्रीलंकेसाठी एक आशेचे किरण म्हणजे ते आपला पुढचा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे ज्यांच्या समोर त्यांचा १००% रेकॉर्ड आहे.

 

नेदरलँड्स आणि श्रीलंका एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

नेदरलँड्स आणि श्रीलंका यांनी २००२ पासून एकमेकांविरुद्ध पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि श्रीलंकेने ते सर्व जिंकले आहेत. भारतात हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध कधीही एकदिवसीय सामने खेळलेले नाहीत. त्याचप्रमाणे हे दोन्ही संघ पहिल्यांदाच विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत.

  नेदरलँड्स श्रीलंका
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) १४
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने (विजय)

 

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील नेदरलँड्स आणि श्रीलंकेची आतापर्यंतची कामगिरी

नेदरलँड्स आणि श्रीलंका आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला चौथा सामना खेळतील. नेदरलँड्सने तीनपैकी एक सामना जिंकून थोडी फार का होईना पण यशाची चव घेतली आहे तर श्रीलंका या विश्वचषकात आतापर्यंत त्या चवीशी वंचित राहिले आहे.

सामना क्रमांक नेदरलँड्स श्रीलंका
पाकिस्तानकडून ८१ धावांनी पराभव दक्षिण आफ्रिकेकडून १०२ धावांनी पराभव
न्यूझीलंडकडून ९९ धावांनी पराभव पाकिस्तानकडून ६ विकेटने पराभव
दक्षिण आफ्रिकेचा ३८ धावांनी पराभव ऑस्ट्रेलियाकडून ५ विकेटने पराभव

 

संघ

नेदरलँड्स: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास दे लीड, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लाईन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकर, शरीझ अहमद, सायब्रँड एंजेलब्रेक्ट.

श्रीलंका: कुसल मेंडिस (कर्णधार), कुसल परेरा, पाथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, महीष थीकशाना, दुनिथ वेललागे, कसुन रजीथा, मथीशा पथीराना, दिलशान मधुशंका, दुषण हेमंता, चामिका करुणरत्ने.

 

दुखापती अपडेट्स

श्रीलंकेचा उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज मथीशा पाथिराना त्याच्या गोलंदाजीच्या हाताला जळजळ झाल्यामुळे आठ ते १० दिवसांसाठी खेळापासून दूर असेल. अनुभवी अष्टपैलू आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमेरा यांना उर्वरित स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून घोषित केले आहे. दुसरीकडे, नेदरलँड्सला दुखापतीची चिंता नाही.

 

खेळण्याची परिस्थिती

लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर नेदरलँड्स आणि श्रीलंका यांच्यातील सामना होणार आहे. श्रीलंका येथे त्यांचा दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्यांना पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. नेदरलँड्स त्यांचा पहिला एकदिवसीय सामना या ठिकाणी खेळणार आहे.

हे ठिकाण या स्पर्धेतील तिसरा सामना आयोजित करणार आहे. येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणार्‍या संघांनी एक जिंकला आणि दुसर्‍या डावात फलंदाजी करणार्‍या संघांनीही एक जिंकला. येथील परिस्थिती फलंदाजीसाठी चांगली आहे. मात्र, खेळपट्टीची निवड; काळी माती (फिरकी गोलंदाजांसाठी सहाय्य) किंवा लाल माती (वेगवान गोलंदाजांसाठी सहाय्य) कोणाला अधिक मदत मिळेल हे ठरवेल.

 

हवामान

भरपूर सूर्यप्रकाशासह हवामान आल्हाददायक राहण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन आणि पावसाची शक्यता नाही. वायव्येकडून वारे वाहतील.

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने तीन सामन्यांमध्ये ५४ च्या सरासरीने आणि ११० च्या स्ट्राइक रेटने १०८ धावा केल्या आहेत. याशिवाय, अष्टपैलू बास दे लीडने बॅट आणि चेंडूने प्रभावीत केले आहे. तीन सामन्यांत सात विकेट्स घेऊन तो आपल्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. फलंदाजीत त्याने एका अर्धशतकासह ८७ धावा केल्या आहेत.

श्रीलंकेचा कुसल मेंडिसचे योगदान अनमोल आहे. या विश्वचषकात आतापर्यंत तीन सामन्यांत ६९ च्या सरासरीने आणि १५७ च्या स्ट्राईक रेटने २०७ धावा करून तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. गोलंदाजांमध्ये दिलशान मधुशंका चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याने तीन सामन्यांत सात विकेट्स घेतल्या आहेत.

Photo credits: AFP

 

 

 

 

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: २१ ऑक्टोबर २०२३

वेळ: सकाळी १०:३० वाजता

स्थळ: भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)