घोरपडीच्या कातडीपासून मडके वाद्य

११७ घोरपडींची कत्तल करणारा वनविभागाच्या ताब्यात

ठाणे : ठाणे वन विभागाच्या पथकाने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी कारवाई केली आहे. ११७ घोरपडींच्या कातडीसह एका आरोपीला मालाड येथून अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपी घोरपडीच्या कातडीपासून मडके वाद्य तयार करत असे आणि चांगल्या किमतीत विकत असे. ही वाद्ये बनविण्यासाठी ११७ घोरपडींची कातडी वापरण्यात आली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश भोईर यांनी दिली.