शौचालयात पाण्याअभावी नागरीकांची गैरसोय

नवी मुंबई : शिळगांवातील वेशीआई मंदिर जवळ  असलेल्या सार्वजनिक शौचालच्या   जलवाहितनित बिघाड झाल्याने पाणी पुरवठा होत आहे.त्यामुळे पाण्या अभावी शौचालयात नागरीकांची मोठी गैरसोय होत असल्याने येथील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला सामोरे जात असताना हागदरीमुक्तिवर जास्त भर दिला जात आहे.आणि त्या अनुषंगाने नागरीकांच्या सोयी साठी शौचालये उभारली जात आहे.मात्र सदर शौचालये उभारल्या नंतर त्यांच्या देखभाल दुरुस्ती कडे ठेकेदारांमार्फत पाठ फिरवल्याचे चित्र सध्या ठाणे महापालिका हद्दीत दिसून येत आहे.
येथिल शिळगांवातील वेशीआई मंदिर येथे सार्वजनिक शौचालय आहे तिथे पाणी पुरवठा करणारी जल वहिनी खराब झाल्यामुळे पाणी येत नाही .त्यामुळे पाण्या अभावी नैसर्गिक विधी साठी जाणाऱ्या नागरी कांची गैरसोय होत आहे.त्यामुळे येथील जल वाहिनी तात्काळ दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शीळ गावातील ग्रामस्थांनी केली आहे.