राजकारण जेव्हा अतार्किक होऊ लागते तेव्हा ते अनाकलनीयही होत असते. पक्षनिष्ठा, त्याचे तत्वज्ञान, कार्यकर्त्यांसमोरील प्रेरणास्थाने वगैरे बाबी विधीनिषेध शून्य पातळीवर येतात. अशा वातावरणात अत्यंत अनैसर्गिक युत्या-आघाड्या होतात आणि शि वीगाळ करणारे एकमेकांचे गोडवे गाऊ लागतात. राजकारणात जे चालते ते सर्व सामान्य जीवनात होत नसते आणि इतके अनैति क आणि विवेकशून्य वर्त न शिक्षे स पात्र ठरण्याऐवजी प्रशंसेचे धनी बनू लागले. राजकारणाला मुळात प्रति ष्ठा देण्यास जनमानस तयार नसताना गेल्या दोन-अडीच वर्षा तील थेरे पाहून नेत्यां बद्दल प्रेम, आपुलकी आणि आदर वाटावा असे राहि ले नव्हते. ही खंत सार्व जनि क चर्चा विश्वात वारंवार ऐकू येत असते. पक्षांतर्ग त भांडणांचा सिलसिला नि वडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी अधि क गंभीर होणार हे भाकि त केले जात होते, आणि ते खरे ठरत आहे.
बेरजेच्या राजकारणाची गणिते उमेदवार ठरवताना चुकीची होऊ लागली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शि ंदे यांना पाहि जे त्या जागा भाजपा द्यायला तयार नाही तर वंचि त आघाडीचे प्रस्ताव धुडकावले गेल्यामुळे महाआघाडीलाही मतविभाजनाचे ग्रहण लागले आहे. राज्यातील सत्तांतर नाट्याचा शेवटचा आणि निर्णा यक अंक सुरु झाला आहे. शि ंदे यांचे काही आमदार ठाकरे गटाकडे, तर शरद पवार यांच्यावर नि ष्ठा असणारे स्वगृही परंतु लागले आहेत. भाजपाकडे आजही ओघ सुरु आहे. परंतु ज्यां च्या मनसुब्यांवर पक्षाने पाणी फेरले ते पुन्हा बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत आहेत. भाजपाचेजळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्य मान खासदार उन्मेष पाटील उबाठात दाखल झाले आहेत. नारायण राणे यांनी केलेल्या विधानामुळे शि ंदे गट नाराज आहे. नाशि कच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शि ंदे यांच्यात मतभेद सुरु आहेत. ठाणे आणि कल्याण मतदारसंघातील जागावाटप डोकेदुखीचा विषय झाला आहे. या सर्व अडचणी म्हणजे महाराष्ट्रातील दोन वर्षा तील उलथापालथीचा परिपाक आहे. पक्षांतराच्या संसर्गा ची मोठी लाट लोकसभा नि वडणुकीच्या वेळी उसळणार हे भाकि त खरे ठरू लागले आहे. दोन वर्षां पूर्वी जी पक्षांतरे झाली त्यामागे
तात्विक वगैरे असे अधि ष्ठान नव्हते. तो शुद्ध सत्ता कारणाचा भाग होता. स्वार्था वर बेतलेले हे राजकारण लोकांना पचनी पडले नव्हते. त्यातून सहानुभूतीची लाट निर्मा ण झाली का आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरे अथवा शरद पवार यांना होईल का, हा स्वतंत्र विषय आहे. परंतु ती शक्यता निर्मा ण झाली हे नाकारताही येणार नाही. आपण मत दि ल्यावर संबंधि त खासदार त्या पक्षात कि ती काळ राहि ल, तो विकासाच्या मुद्यावर चर्चा करीत राहील की सत्ते चे राजकारण खेळण्यात मग्न होईल, अशा शंका आम जनतेच्या मनात आतापासूनच फेर धरू लागल्याआहेत. प्रति मा-भंजनाची जोखिम घेतलेले नेते मतदारांसमोर कसे जातील या विवेचनेत असताना त्यां चे सहकारी त्यां ची साथ सोडून जाऊ लागले आहेत. त्याबद्दल आश् चर्य वाटण्याची गरज नाही. ये तो होना ही था !