ठाणे : महाराष्ट्र राज्य आॅलिंपिक 2023 स्पर्धेमध्ये ठाण्याच्या स्वप्नील वाल्मिक मांढरे या खेळाडूने ‘ज्यू-दो’ या खेळामध्ये – 90 किलो वजनी गटामध्ये सिंधुदुर्ग व बीड जिल्ह्याच्या स्पर्धकांना चितपट करुन रौप्य पदक पटकावले.
गेल्या आठवड्यात पुणे येथील बालेवाडीत झालेल्या आॅलिंपिक 2023 स्पर्धेत मांढरेने ज्यू-दो खेळात – 90 किलो वजनी गटामध्ये दोन्ही जिल्ह्यांच्या स्पर्धकांना हरवून रौप्य पदक पटकावले. या क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून सुमारे 90 खेळाडू सहभागी झाले होते. मांढरे हा ठाणे येथील सरस्वती क्रीडा संकुल येथे वयाच्या १२ व्या वर्षापासून ज्यू-दोचे प्रशिक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्यूदो’चा सराव करत आहे. स्वप्निल यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वप्निल हा मूळचा साता-यातील लोहोम खंडाळा येथील असून तो राष्ट्रीय कुस्ती खेळाडू आहे. गेल्या चार वर्षापासून मुंबई युनिव्हर्सिटीचे कुस्ती व जुदोचे प्रतिनिधित्व करून विद्यापीठाचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेले आहे. स्वप्निल हा कापूरबावडी पोलीस ठाणे येथील उपनिरीक्षक आणि राष्ट्रपती पोलीस पदक विजेते वाल्मिक मांढरे यांचा मुलगा असून त्याची बहीण सुप्रिया यादेखील पोलीस उपनिरीक्षक अूसन राष्ट्रीय जुडो व कुस्ती खेळाडू आहे.