सॅण्टा, आम्हाला नेते कधी समजतील ?

वर्तमानपत्रे आणि एकुणातच माध्यमांतून प्रसिध्द होणाऱ्या राजकीय बातम्या गांभीर्याने घेणे नागरिकांनी केव्हाच सोडून दिले आहे. कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे वर्तमानपत्र चालवणाऱ्या मंडळींच्या पोटात गोळा आला आहे. कोरोनाचा विषाणू वर्तमानपत्रातून घरपोच होतो ही अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीने या उद्योगाची पुरती वाताहात केली असली तरी काही माध्यमे राजकारण्यांना उगा डोक्यावर घेऊन त्यांचे फाजिल महत्व वाढवत असतात. अलिकडे अशाच एका सार्वजनिक कार्यक्रमात सत्तारुढ पक्षाचे प्रमुख नेते विरोधी पक्षांतील त्यांच्या ‘सहकाऱ्यां’बरोबर चक्क एका पार्टीत हास्यविनोद करताना जनतेने पाहिले. म्हणजे सभागृहात एसआयटीकडून चौकशी करण्याची अथवा कोणाचे वादग्रस्त रिसॉर्ट पाडण्याची घोषणा करायची आणि दसु रीकडेसंध्याकाळी छान गुलाबी थंडीत एकत्र येऊन मेजवानी झोडायची! हे छायाचित्र पाहून प्रत्येकाच्या मनात एकच प्रतिक्रिया उमटली असेल की बाबारे, हे नेते कोणत्या मातीपासून बनले आहेत? त्यांना उपजत मानवी भावना असतात की नाही? त्यांच्या संवेदना जातात कु ठे? की असंवेदनशील माणसेच राजकारणात टिकू शकतात? कोणी एका नेत्यानेसभागृहात अपशब्द वापरला म्हणून त्यावरुन गदारोळ माजतो. परंतु अशा मेजवान्या मात्र जनता निमूटपणे स्विकारत असते, याचेआश्चर्य वाटते. हिवाळी अधिवेशनात सुरु असलेला सावळा गोंधळ, सत्तारूढ-विपक्ष यांच्यातील शाब्दिक चकमकी, लोकशाहीच्या सिद्धांताच्या बड्या बड्या गप्पा, आरोप-प्रत्यारोपांच्या फै री, विधानभवनाबाहेर ठिय्या आंदोलने, माध्यमांना चमचमीत बाईट देण्याचा सपाटा आदी प्रकार पाहिलेतर सर्वसामान्य माणूस पार चक्रावून जातो. त्यात पुन्हा संध्याकाळी या सर्व भांडणाऱ्या, एकमेकांच्या अं गावर धावून जाणाऱ्या आणि एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या नेत्यांना एकत्र खान-पान कार्यक्रमात पाहिले की जनतेची मती तर सुन्न होऊन जाते! कु ठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा प्रश्नविचारणारी जनता आता मध्यरात्री घरी येणाऱ्या सॅण्टाला एकच प्रश्न विचारतील – आम्हाला राजकारण समजण्याची बुद्धी कधी देशील? ते समजल्यावर ते पचवण्याचीही शक्ती देशील काय? आणि पचल्यावर कोणताही मानसिक धक्का बसणार नाही, यापासून संरक्षण देशील काय? अशा पुरवणी मागण्या कराव्या लागतील. तुर्तास नेत्यांचे हास्यविनोद आणि थट्टा-मस्करी पाहून महाराष्ट्रात कोणताही गंभीर प्रश्न शिल्लक राहिला नसावा आणि सर्वकाही आलबेल आहे, असाच समज होतो. हे
अनुमान खरे निघावे हीच सॅण्टाकडेप्रार्थना! त्याच्या पोतडीतील आश्चर्ये संपतीलही, पण नेत्यांची पोतडी मात्र कधीच रिकामी होत नसते. त्यांचे ‘नॉन-स्टॉप’ धक्कातंत्र मागील पानावरुन पुढे, वर्षानुवर्षेसुरु असते! सॅण्टाला जाता-जाता एक विनंती करावीशी वाटते. यापुढे अधिवेशनापूर्वीचे चहापान तेवढेतूच आयोजित करीत जा…निदान त्यावर तरी कोणी बहिष्कार घालणार नाही, कसे?