पृथ्वीरक्षण आणि जीवन; गुणसागर स्पर्धेत अव्वल

शिवसेना गणेश दर्शन स्पर्धेचा निकाल जाहीर

ठाणे : शिवसेना ठाणे जिल्हा गणेश स्पर्धेत ‘पृथ्वी रक्षण आणि जीवन’ या विषयावर देखावा साकारलेल्या कळव्यातील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.

शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे घेण्यात आलेल्या या अभिनव स्पर्धेचे यंदाचे 30 वे वर्षे आहे. उत्सव साजरा करणाऱ्या संस्थाच्या उत्साहाला विधायक वळण मिळावे या उदात्त हेतूने व त्यातून समाजप्रबोधनाने हिंदुत्व व राष्ट्रीयत्वाच्या भावना वाढीस लागाव्या या हेतूनेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे शहराप्रमाणेच कल्याण विभागामध्ये देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी प्रा. प्रदीप ढवळ, व्यापारी व्यावसायिक अरविंद दातार, चित्रकार गणेश भावसार व किशोर नादावडेकर, कवी अरुण म्हात्रे, प्रा. हर्षदा लिखिते, प्रा. मंदार टिल्लू, प्रा.संतोष गावडे, प्रा. दत्तात्रय चितळे, निता देवळालकर, दिनेश राणे, राजन बने, वास्तुविशारद मकरंद तोरस्कर, संदीप प्रभू, अभिषेक जैन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

परीक्षकांनी केलेल्या निरीक्षणानुसार ठाणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विजेते म्हणून निवड झालेली आहे. प्रथम कमांक गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा विषय – ‘पृथ्वीरक्षण व जीवन’ (रोख 1 लाख), द्वितीय क्रमांक शिवसम्राट मित्र मंडळ, गांधीनगर कोपरी विषय- ‘साथीचे रोग’ (रोख 75 हजार), तृतीय क्रमांक पोलीस मुख्यालय प्रा.शाळा श्री गणेशोत्सव मंडळ, सेंट्रल मैदान विषय – ‘पर्यावरण’ ( रोख 50 हजार), चतुर्थ क्रमांक ओमशक्ती विनायक मित्र मंडळ, गांधीनगर, कोपरी विषय – ‘जीवनदायी नदी’ ( रोख 25 हजार), पाचवा क्रमांक जयभवानी मित्र मंडळ, आझादनगर, जरीमरी मंदिरामागे विषय-‘भारुडाच्या माध्यमातून विधवाप्रथा बंद जनजागृती’ ( रोख 21 हजार), सहावा क्रमांक शिवगर्जना मित्रमंडळ, वॉकरवाडी विषय-‘हस्तकला व ओरेगामी कलेतून बनविलेली पर्यावरणपूरक कलाकृती’ ( रोख 15 हजार), सातवा क्रमांक कोलबाड मित्र मंडळ, कोलबाड विषय- ‘दोरखंडापासून बनविलेले काल्पनिक महल’ ( रोख 15 हजार), आठवा क्रमांक जनजागृती मित्र मंडळ किसननगर विषय-प्रतिपंढरपूर’ (रोख 15 हजार), नववा क्रमांक नवयुग मित्रमंडळ, पारशीवाडी कोपरी विषय-‘शिवसृष्टी’ ( रोख 15 हजार), दहावा क्रमांक डवलेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्यनगर, पाडा नं. 3 विषय- ‘गुहा आणि पाण्याचा झरा’ (रोख 15 हजार) तर आदर्श गणेशोत्सव मंडळ म्हणून पंचशील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सिंग उद्योगनगर ठाणे विषय-काल्पनिक महल’ ( रोख 10 हजार) उत्कृष्ट मूर्तीसाठी प्रथम क्रमांक श्री अष्टविनायक मित्र मंडळ, गणपती मंदिरशेजारी, पाडा नं. 4 लोकमान्यनगर ठाणे मूर्तीकार आशिष कुचेकर, सायन मुंबई ( रोख 10 हजार), द्वितीय क्रमांक गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव, कळवा मूर्तीकार निळकंठ गोरे ( रोख 10 हजार) यांना प्राप्त झाले आहे.
तर लक्षवेधी विशेष पारितोषिके सार्वजनिक उत्सव मंडळ, जयभवानीनगर विषय- ‘शिवसेना कोणाची’, प्रादेशिक मनोरुग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव, मेंटल हॉस्पीटलजवळ, ठाणे विषय- ‘रुग्णांच्या मानसिक अवस्थेवर आधारित मनमंदिर देखावा’, श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, श्रीरंग सोसायटी ठाणे विषय- ‘प्राचीन मंदिर’, जिज्ञासा मित्र मंडळ, दगडी शाळेसमोर चरई विषय- ‘इकाफ्रेंडली कापडी महल’ व स्नेहाकिंत मित्र मंडळ, यशआनंद सोसायटी, विष्णूनगर, ठाणे विषय-‘काल्पनिक मंदिर’ यांची निवड झाली असून प्रत्येकी रोख रुपये 10 हजार देवून गौरविण्यात येणार आहे.

उत्कृष्ट सजावट ओमशक्ती विनायक मित्र मंडळ, लेप्रसी कॉलनी, गांधीनगर, कोपरी, ठाणे पूर्व विषय – जीवनदायी नदी , सजावटकर श्री लॉरेन्स ( रोख 10 हजार)
उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये सचिन 8 मित्र मंडळ, संतज्ञानेश्वर नगर, वागळे इस्टेट, ओम सन्मित्र मंडळ, पडवळनगर, वागळे इस्टेट, कशिश पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कशिश पार्क, आई जीवदानी मित्रमंडळ, साईमंदिर, जोगिला मार्केट उथळसर, गोपाळ गणेश मित्र मंडळ, कॅसल मिलजवळ ठाणे, शिवसेना पुरस्कृत – सार्वजनिक उत्सव मंडळ,स्वा. सावरकर नगर, बाळ मित्र मंडळ, स्वा. सावरकर नगर, शिवसेना पुरस्कृत- सार्वजनिक मंडळ, किसन नगर,३ यांची निवड झाली असून प्रत्येकी रोख 10 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

कल्याण विभागात उत्कृष्ट सजावटीसाठी प्रथम क्रमांक शिवनेरी मित्र मंडळ, श्रीराम मंदिरजवळ, जोशीबाग कल्याण (रोख 25 हजार), द्वितीय क्रमांक उत्कर्ष मित्र मंडळ, कै. धोंडिराम यशवंत चौक, रामबाग कल्याण (रोख 21 हजार), तृतीय क्रमांक श्रीमंत बाळ गणेश मित्र मंडळ, वैश्यमंदिर हॉलसमोर कासारहाट कल्याण (रोख 15 हजार) व उत्तेजनार्थ नवतरुण मित्र मंडळ, न्यू विठ्ठलवाडी परिसर, मोहने कल्याण (रोख 10 हजार) व शिवनेरी मित्र मंडळ, अंबिका नगर, गोग्रासवाडी, डोंबिवली (रोख 10 हजार) यांना प्राप्त झाले आहे.

तर उत्कृष्ट मूर्तीकार म्हणून प्रथम क्रमांक बाळ गणेश मित्र मंडळ, गावदेवी मंदिर,पैलवान विश्वास इश्वाद चौक, कासारहाट, कल्याण मूर्तीकार – प्रशांत गोडांबे ( रोख 11 हजार), द्वितीय क्रमांक जयमहाराष्ट्र मित्र मंडळ, हनुमान मंदिर, पुण्यश्लोक अहिल्याबाई चौक, कल्याण मूर्तीकार किरण उपगावकर ( रोख 7500), तृतीय क्रमांक दूधनाका गणेशप्रेमी मित्रमंडळ, दूधनाका चौक कल्याण मूर्तीकार जयदीप आपटे ( रोख 5 हजार) तर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रबोधन मित्रमंडळ, जोशीबाग, रामबाग मेनरोड कल्याण मूर्तीकार गणेश कल्याणकर ( रोख 5 हजार) यांना जाहीर झाले आहे.