ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ऑगस्ट २०२२मध्ये डेंग्यूचे संशयित रुग्णसंख्या २३ आणि निश्चित निदान झालेले एकूण दोन रुग्ण आहेत. तर मलेरियाचे ७५ रुग्ण आढळून आले. चिकनगुनियाची रुग्णसंख्या शून्य आहे.
यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गृहभेटी देऊन एकूण ४४,८९६ घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ५५७ घरे दूषित आढळून आली. तसेच एकूण ६१,३१४ कंटेनरची तपासणी केली असता ६६२ कंटेनर दूषित आढळून आले आहेत.
६६२ दुषित कंटेनरपैकी २७७ कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले व ३७३ कंटेनर रिकामी करण्यात आले. तसेच चार ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले. या अनुषंगाने दरम्यानच्या कालावधीत कार्यक्षेत्रात ५० हॅण्डपंप, ट्रॅक्टर्स-१०, ई रिक्षा सहा, १० बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रात २,७०८ ठिकाणी औषध फवारणी आणि धुरफवारणी हॅण्डमशीनद्वारे १७,९४६ ठिकाणी धूरफवारणी करण्यात आली असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव यांनी नमूद केले.