ठाण्यात कोरोनाचे नवीन ३६ रुग्ण

ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांची वाढ मंदावली असून आज ३६ रुग्णांची भर पडली आहे.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ३५जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ९३,७२२ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ४३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २,१५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ३९६ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ३६जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २५ लाख १८,७३५ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९६,३१२जण बाधित मिळाले आहेत.