३०० विद्यार्थी साकारणार ‘कॉफी पेंटींग ऑफ बाळासाहेब ठाकरे’

ठाणे : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एकाच वेळी ३०० विद्यार्थी चित्रांजली अर्पण करणार आहेत.

बाळासाहेबांची शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, ठाणे आयोजित कार्यक्रमात सोमवार २३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपपर्यंत माँसाहेब मिनाताई ठाकरे उद्यान स्वातंत्र्यवीर सावरकर नगर उद्यानात ४ थी ते ७ वी मधील ३०० विद्यार्थी एकाच वेळी ‘कॉफी पेंटींग ऑफ बाळासाहेब ठाकरे’ या उपक्रमात चित्रांजली अर्पण करणार आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध चित्रकार डग्लस जॉन असून विशेष उपस्थिती सिने नाट्य कलाकार दिपकार पारकर असणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक दिलीप बारटक्के आणि शाखाप्रमुख हितेंद्र लोटलीकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9892258457 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.