जिल्ह्यात कोरोनाचे २२ सक्रिय रुग्ण

ठाणे : जिल्ह्यातील नवीन कोरोना रूग्णवाढ हळूहळू होत असून आज तीन रुग्णांची भर पडली आहे तर सक्रिय रुग्णांची संख्या २२वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका हद्दीत तीन नवीन रूग्ण सापडले आहेत. उर्वरित जिल्ह्यामध्ये एकही रूग्ण मिळाला नाही. नवी मुंबई येथे सर्वाधिक १७जण सक्रिय रूग्ण आहेत. ठाण्यात एक रूग्ण सक्रिय आहे.

आत्तापर्यंत सात लाख ४७,४२९जण बाधित सापडले आहेत तर रुग्णालयात आणि घरी २२रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३६,२०८ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ११,९६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.