मोरोशी आश्रमशाळेत ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा

मुरबाड,दि.२१(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा मोरोशी येथील ३८ विध्यार्थ्यांना आज दुपारच्या सुमारास विषबाधा झाल्याची घटना घडली असून, सर्व विध्यार्थ्यांवर टोकावडे येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यातील माळशेजघाट रस्त्यावर मोरोशी येथे शासकीय आदिवांसी आश्रम शाळा असून या शाळेत ६०० विध्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत. आज दुपारी एकच्या सुमारास विध्यार्थ्यांनी नास्ता केल्या नंतर यातील काही विध्यार्थ्यांना उलट्या सुरू झाल्या. हा प्रकार एकच्या सुमारास घडल्या नंतर यातील दोन विध्यार्थ्यांना मोरोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. या मुलांवर थातूर मातूर उपचार करुन उर्वरीत विध्यार्थ्यांना आश्रम शाळेत ठेवण्यात आले होते. मात्र सर्व विध्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चार वाजता टोकावडे येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील ३४ विध्यार्थ्यांना उपचार करून, सोडण्यात आले. तर चार विध्यार्थ्यांची तब्बेत चांगली नसल्याने त्यांच्यावर अधिक उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुरबाडचे तहसीलदार सचीन चौधर, नायब तहसीलदार हनुमंत जगताप, मंडळ अधिकारी डामसे, माजी जिल्हा परीषद सदस्य संजय पवार यांनी तात्काळ टोकावडे येथे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलांची चौकशी करून, त्यानंतर मोरोशी आश्रम शाळेत जाऊन परीस्थीतीची पाहणी केली. मागील वर्षी याच परीसरातील माळ येथील आश्रम शाळेतील तीस विध्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती. मात्र या घटनेचा मोरोशी आश्रम शाळेच्या शिक्षक, कर्मचार्‍यांनी धडा न घेतल्याने मोरोशी येथील आश्रम शाळेत असा प्रकार घडल्याचा आरोप पालक करीत आहेत. विद्यार्थ्यांची नावे-शितल पारधी, निलम वाघ, दिव्या कवटे, आशा वाघ, सोनाली कवटे, संध्या शेलके, मनीषा वाघ, कमल खाकर, जयश्री खाकर, अनवती ठोंबरे, संगीता भला, कोमल पोकळा, माया शेवाळे, किर्ती भला, साजन खाकर, भास्कर भला, सुमन भला, भारती भला, योगेश खाकर, सुनील खाकर, अमीर मेंगाळ, गुरुनाथ मेंगाळ, उज्ज्वला शेवाळे, प्रांजली शेळकदे, प्रियंका जाधव, निलम वाघ, तनीष्का मुकणे, वामन ईरनक, दीपाली शेलकंदे, रेश्मा मेंगाळ, लहू मधे, लखू हिलम.