‘दारुबंदी’ लघुचित्रपटाचे मुरबाड येथे प्रदर्शन

मुरबाड,दि.२६(वार्ताहर)-तालुक्यातील एस एस जी पी प्रॉडक्शन निर्मित व गर्जा कलामंच, मुरबाड प्रस्तुत दारुबंदी या मराठी लघुचित्रपटाचा प्रदर्शन सोहळा रविवारी क्रांती टॉकीज मुरबाड येथे मान्यवर, व कलावंताच्या उपस्थितित संपन्न झाला. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील कुटुंबप्रमुख दारुच्या आहारी गेला असेल तर, त्या कुटुंबावर होणारे विपरीत परिणाम, त्याच्या मुलांना समाजा कडून मिळत असलेली तिरस्काराची वागणूक, घरात होणारी पत्नी व मुलांना मारहाण, दारूसाठी वाटेल ते करण्याची दारूड्याची करामत या सत्य घटनेवर आधारित मुरबाडच्या ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील तरूण व गर्जा कलामंच या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष, दारुबंदी लघुचित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक नितेश मंगल डोंगरे यांनी व प्रफुल अशोक मोरे यांनी निर्मिती केलेल्या दारुबंदी या मराठी लघुचित्रपटाचा प्रदर्शन सोहळा आज आयोजित केला होता. या प्रदर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमाला एकच प्याला या नाटकाचे कलाकार सुशांत शेलार, अमोल बावडेकर, पल्लवी वैद्य, स्वप्निल राजशेखर, विनायक भावे, मृणालिणी, सायली सांबरे मंकरंद पाद्य, निर्माता प्रफुल अशोक मोरे, नितेश डोंगरे, पोलीस निरीक्षक अजय वसावे, स. पो .नि .सुनिल तांबे मुरबाड पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, पो उप. निरिक्षक अशोक घनघाव, गणपतजी विशे तात्या, कांतीलाल कंटे, रामभाऊ दुधाळे, नगरसेविका छाया चौधरी, नंदा गोडांबे, हॉरर नाईट चा छोटा हिरो रंजित पष्टे, श्रीकांत धुमाळ, चंदु राणे, सचिन विशे इत्यादि मान्यवर उपस्थित होते. या लघुचिञपटाचे चित्रीकरण जिल्हा परिषद शाळा करवेळे येथे करण्यात आले असून मुरबाड सारख्या ग्रामीण भागातील तरुणाने मांडलेलं हे सत्य विदारक नक्कीच जनतेला प्रेरणादायी ठरेल अशा स्वरुपाचा संदेश अनेकांनी मनोगतातून व्यक्त करून हा चित्रपट लवकरात लवकर मोठा चित्रपट व्हावा. अन् नितेश डोंगरे यांनी तसे प्रयत्न करावेत. अशी अपेक्षाही उपस्थितांनी व्यक्त केली.