‘अंकुर’ला मिळाला आजी-आजोबांचा आशीर्वाद

डोंबिवली,दि.३१(वार्ताहर)-आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून समाजसेवा करण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या डोंबिवलीतील यअंकुरय या सामाजिक संस्थेचे भविष्यात वटवृक्षात रुपांतर होऊ दे असा आशीर्वाद ङ्गआईङ्घ वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी दिला. अंकुर संस्थेचा वर्धापनदिन गुरुवारी संपन्न झाला झाला. २८ डिसेंबर २०१६ रोजी अंकुर सामाजिक संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या अध्यक्षा अक्षदा भोसले, उपाध्यक्ष पवन तिरंगे, सचिव अक्षय भोसले, खजिनदार दिनेश पाटील, सदस्य-रुपेश भोईर, योजना भोईर आणि निखील कुडकर यांनी एका वर्षात अनेक सामाजिक उपक्रम केले आहेत. १४ नोव्हेंबर रोजी बालदिनाचे औचित्य साधून वशिंद येथील ढवळेपाडा येथील आदिवासी पाड्यात गरीब विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेऊन त्याच्यातील कलागुणांना वाव देण्याचा छोटासा प्रयत्न या संस्थेने केला. पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात जागतिक महिला दिनी ज्या मातांनी मुलीना जन्म दिला अशा दोन मतांचा गौरव करून त्यांना दोन हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर आसनगाव येथील अजनुमपाडा शाळेला छोतीशी मदत म्हणून शाळेत ६० विद्यार्थ्यांना पाट्या दिल्या. संस्थेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ङ्गआईङ्घ वृद्धाश्रमात आजी-आजोबांचा आशीर्वाद घेतला असे संस्थेच्या अध्यक्षा अक्षदा भोसले सांगितले. त्या पुढे म्हणाल्या मनात समाजसेवा करण्याचा विचार होता. संस्थेची स्थापन करून गरिबांना जेवढी मदत करायची आहे तेवढी करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. नुकतेच ु.रपर्ज्ञीीीरपीींहर.ेीस ही वेबसाईड सुरु केली असून यामध्ये संस्थेबद्दलची सर्व माहिती आहे.