शिक्षक, मुख्य लिपिकास विद्यामंदिरात शिरून पालकांची मारहाण

भिवंडी,दि.२६(वार्ताहर)-भिवंडी कल्याण रस्त्यावरील कोनगावी असलेल्या आठगांव विद्यामंदिर येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यास आभ्यासावरून शिक्षकांनी धाक दाखवला असता त्याचा राग मनात धरून विद्यार्थी व पालक यांनी विद्यामंदिरात येऊन शिक्षक बंडू पाटील यांना मारहाण केली. यावेळी मुख्य लिपिक विजय पाटील हे मदतीला धाऊन गेले असता त्यांनाही मारहाण केली या प्रकरणी तक्रार केल्यानुसार कोनगांव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून विद्यार्थी, पालक वगैरे चौघांना अटक केली आहे. या संतापजनक घटनेची माहिती अशी की पिंपळास येथे राहणारा विद्यार्थी आठगाव विद्यामंदिरात शिकत आहे त्याला आभ्यास करण्यावरून शिक्षक ओरडले म्हणून त्याने पालकांना सांगितले पालकांनी मुख्याध्यापक किंवा संस्थाचालक यांच्याकडे कोणताही संपर्क न साधता किंवा तक्रार न करता यशवंत बजागे, राहुल बजागे, करण बजागे, बबलेश पाटील या चौघांनी शिक्षक आणि मुख्य लिपिक यांना मारहाण केली या मारहाणीच्या कृत्याचा सर्व थरातून निषेध केला जात आहे.