विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून हुतात्म्यांना मानवंदना

मुरबाड,दि.३१(वार्ताहर)-भारतीय स्वातर्ंत्य लढ्यातील सिद्धगड रणसंग्रामातील क्रांतीवीर हुतात्मा विर भाई कोतवाल व वीर हिराजी गोमाजी पाटील यांच्या बलिदानाला २ जानेवारी रोजी ७५ वर्ष पुर्ण होत असुन, त्यानिमित्त व सालाबाद प्रमाणे यंदाहि विविध सांस्क्रुतिक, ऐतिहासिक व कलाक्रुती कार्यक्रमातुन क्रांतीविरांना मानवंदना दिली जाणार आहे. भारतीय स्वांतर्त्य लढ्यात ठाणे,रायगड व पालघर जिल्ह्यातील समाज धुरणांचे कार्य मौलिक आहे.त्यातील आझाद दस्त्यातील अनेक शुरविरांनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले होते.मात्र एक दिवस आपल्याच देशद्रोही गद्दारांमुळे या आझाद दस्त्यातील विर भाई कोतवाल व विर हिराजी गोमाजी पाटील या वाघाच्या जोडीला देशासाठी विरमरण पत्कारावे लागले अन् तेही.आपसातील ङ्गंदङ्गितुरी मुळेच,हा घात झाला,इंग्रज अधिकारी हॉंलने १ जानेवारी च्या पहाटेस ६ वाजुन १० मि निटांच्या सुमारास म्हणजेच २ जानेवारी १९४३ ला बेछुट गोळ्यांच्या वर्षावात पिंजुन काढले. आणि सिद्धगडची माती पवित्र झाली.भारताच्या इतिहासातील एक पान सुवर्ण अक्षरांनी लिहलं गेलं.या रक्तरंजित इतिहासाला २ जानेवारी २०१८ ला ७५ वर्ष पुर्ण होत असुन त्यांना मानवंदना अर्पन करण्यासाठी ठाणे, पालघर,रायगड व पुणे जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक, सामाजिक व नवयुवक मंडळे व संस्थांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच क्रांती ज्योतींचे आगमन होत असते.पहाटे क्रांती स्तंभावर क्रांतीज्योत पेटवुन मानवंदना दिली जाते. दुपारच्या वेळेस भव्य कुस्ती आखाडा होत असतो .त्यात दुरवरचे पैलवान हजेरी लावतात व अशा पद्धतीने यंदाचं हे अम्रुत महोत्सवी वर्ष साजरे होत असुन यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालक मत्रं ी एकनाथ शिदं ,े खा.कपिल पाटील, आ.किसन कथोरे,माजी आमदार दिगंबर विशे,गोटीराम पवार हे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील, जिल्ह्यातील नागरिकांनी,जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रांतीविरांना मानवंदना द्यावी असे संयोजक समितीच्या वतीने आवाहन केले आहे.