विमानतळ परिसरातील शाळांचे स्थलांतर पुढील वर्षापासून

नवी मुंबई,दि.२६(वार्ताहर)-आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी आणि इतर कामांसाठी एकूण १० गावांचे स्थलांतर पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेअंतर्गत पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रांमध्ये (पॉकेटस्) करण्यात येत आहेत. या १० गावांपैकी पाच गावे मौजे-वडघर हद्दीत तर अन्य पाच गावे मौजे-वहाळच्या हद्दीत स्थलांतरित करण्यात येत आहेत. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या विचारात घेऊन मौजे-वडघर येथील पॉकेटसाठी ३००० चौ. मी. चा एक भूखंड व मौजे-वहाळ येथील पॉकेटसाठी ३००० चौ.मी. चा एक असे दोन भूखंड जिल्हा परिषद शाळेसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. या भूखंडांवर अनुक्रमे ३५७६ चौ.मी. व ४३५० चौ.मी. च्या शाळा इमारती बांधण्यात आल्या आहेत.