वासिंदकरांना प्रतिक्षा उड्डाणपुलाची

शहापुर,दि.२७(वार्ताहर)-गेल्या ४० वर्षापासून पावसाळ्यात वासिंद पुर्व पश्चिम ये जा करण्यासाठी तसेच पश्चिमेकडील ४२ गावांना जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे वासिंद रेल्वे गेट पुल परंतु वाहनचालकांना ये जा करण्यासाठी एकमेव असलेला बोगदा पुल दर वर्षी पावसाळ्यात तुडुंब पाण्याने भरल्याने वाहतुकीस आपोआपच बंद होते. वासिंद पुर्व कडे जाण्यासाठी प्रवाशांना मैलभर पदयात्रा करण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. त्याचबरोबर पुर्व भागात असलेल्या ४२ गावांना वासिंद येथे वाहतूक करण्यासाठी २० किमीचा उलटा फेरा मारावा लागत असतो.हि समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून वासिंद परिसरातील जनतेच्या पाचवीला पुजेलेलीच होती.यावर्षी दरवर्षी प्रमाणेच हा बोगदा वजा पुल पाण्याने तुडुंब भरल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार कपिल पाटीळ यांनी वासिंद परिसरातील हजारो जनतेच्या या लक्षवेधी समस्येकडे लक्ष्य केंद्रीत करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत ३३ कोटींचा निधी वासिंद पुर्व पश्चिम जोडणारा उड्डाणपूलासाठी मंजुर केला आहे.महिनाभरापुर्वीच या उड्डाणपूलाचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. यापूर्वी देखील २४ वर्षात अनेक आंदोलन, उपोषण, मोर्चे या मागणीसाठी झाल्याचे येथील ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक वर्षांपासून मागणी करुन देखील येथे पर्यायी मार्ग म्हणुन रेल्वे गेट रेल्वे प्रशासन खुला करत नसल्याने व पावसाळयात तुडुंब भरणारा रेलवे बोगदा पूलाची पाहणी साठी उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायमुर्ती मंजुला चेल्लुर यांनी आदेश देत सत्य पाहणी कमिशन नेमले आहे. याबाबत वासिंद येथील सजंय सुरळके यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.