वंदना-मखमली तलाव उड्डाणपूल झाला सज्ज

ठाणे,दि.१३(वार्ताहर)-ठाण्यातील नियोजित उड्डाणपुलांपैकी वंदना सिनेमा ते मखमली तलाव उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून वाहतूक सुरू झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात
सुटणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचे डोळे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाकडे लागले आहेत. वंदना ते मखमली उड्डाणपूल दुपदरी असून त्याची लांबी ८०० मीटर आहे. सुमारे २८ कोटी रुपये याकामी खर्च झाले असून पुलावरील डांबरीकरणही पूर्ण झाले आहे. हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर संत राममारुती रोडकडे जाणार्‍या वाहनांना मोकळा ेशास घेता येणार आहे. अल्मेडा चौक, नुरीबाबा दर्गा आणि चरईकडे जाणारी वाहतुकही यामुळे सुरळीत होणार आहे. येथे वर्षभर विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतो. या पुलामुळे मात्र ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे उद्घाटन कधी होते याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.