मुरबाडमध्ये रंगली मधुरांगणची मंगळागौर

मुरबाड, दि.२३(वार्ताहर)-प्रबोधनात्मक विचार जपून चौकटीला धक्का न लावता कला गुणांच्या माध्यमातून मुरबाड येथे सादर करण्यात आलेल्या मंगळागौरीच्या नाचाने मुरबाडच्या महिला मंत्रमुग्ध झाल्या. त्याच्या जोडीला मोदक बनविण्याच्या स्पर्धेने कार्यक्रमाला रंगत आली. मधुरांगणतर्ङ्गे मुरबाड येथे मंगळवारी २२ ऑगस्टला हुतात्मा हिराजी पाटील सभागृहात मंगळागौर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी डोंबिवली येथील स्वामिनी मंडळाने जुन्या पिढीतील तांदूळ सडणे, लोणी काढणे, श्रावण महिन्यातील कामे करताना गायली जाणारी गाणी झिम्मा ङ्गुगड्या त्याचबरोबर आगोटा पागोटा या गाण्यात नव्या पिढीतील महिलांच्या जिन्सची ङ्गॅशन सेल्ङ्गीची क्रेझ याचे वर्णन करता करता पाणी बचत, बेटी बचाओ असा संदेश दिला. रश्मी येवले व अंजनी येवले यांनी उत्कृष्ट निवेदन करून महिलांना दोन तास वेगवेगळ्या प्रकारची नृत्ये सादर करून खुर्चीला खिळवून ठेवले. मोदक बनविण्याच्या स्पर्धेत सुनीता खंडागळे उकडीचे मोदक प्रथम क्रमांक, कविता भट्टड ङ्गुटण्याचे मोदक व्दितीय क्रमांक, रश्मी रोठे शेवळीचे मोदक तृतीय क्रमांक या प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. मोदक स्पर्धेच्या परीक्षक म्हणून अंजू वाडेकर व प्राची प्रमोद शिंदे यांनी काम केले. मुरबाडचे नगराध्यक्ष किसन कथोरे, उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी व तन्मय मॅटर्ननिटी हॉस्पिटल व नर्सिंग होम मुरबाडचे संचालक डॉ. जितेंद्र बेंडारी कार्यक्रमाचे प्रायोजक होते. कार्यक्रमाचे संयोजन मधुरांगण टीमच्या योगिता नागरे,
आशिष कांदे व मंगेश खुळे यांनी केले. सूत्रसंचालन धनश्री गंधे यांनी केले मुरबाडमधील मधुरांगण केंद्रप्रमुख नंदा गोडांबे, सुश्मिता तेलवणे, शिल्पा देहेरकर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. अनिल पाठक यांनी यावेळी महिलांना श्रावण महिन्याचे महत्त्व सांगितले तसेच मढ देवस्थानतर्ङ्गे गणपती अर्थवशीर्ष पठणासाठी महिलांना आमंत्रित केले.