मामाच्या गावाला जाताना रेल्वेतून पडून भाच्याचा मृत्यू

डोंबिवली,दि.२५(वार्ताहर)-मामाच्या गावाला जाण्यासाठी निघालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. अर्जुन रमेशराव असे मुलाचे नाव असून तो डोंबिवलीतील रहिवासी होता. तो मामासोबत इंद्रायणी एक्सप्रेसने सोलापूर येथे जात होता. डोंबिवली पश्चिमेत राहणारा अर्जुन रमेशराव हा मुलगा त्याच्या मामासह बुधवारी सकाळी सोलापूर येथील गावी जाण्यासाठी निघाला होता. इंद्रायणी एक्स्प्रेस बुधवारी सकाळी चिंचवडजवळ आली असता अर्जुनचा तोल गेला आणि तो ट्रेनधूलखाली पडला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे भाचा ट्रेनमधून पडल्याची माहिती मामालाही नव्हती. पोलिसांनी या घटनेची माहिती अर्जुनच्या कुटुंबीयांना दिली आणि हा प्रकार समोर आला.