बदलापूरात ‘रेरा’ बाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

बदलापूर,दि.२०(वार्ताहर)-बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आणि ग्राहकांना अधिकाधिक कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी आणलेल्या रेरा कायद्याविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बदलापूरच्या जान्हवी हॉलमध्ये बुधवार २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता, मार्गदर्शन शिबीर होणार असून या मार्गदर्शन शिबिरास जास्तीत जास्त विकासकांनी उपस्थित रहावे असे आवाहन असोशिएशन चे अध्यक्ष शंकर भोईर आणि उपाध्यक्ष संजय जाधव यांनी केले आहे. शासनाने १मेपासून रेरा कायद्याची अंमलबजावणी केली आहे. रेरा कायद्याविषयी मार्गदर्शन व्हावे आणि ‘रेरा’ संदर्भात विकसकांना भेडसावणार्‍या समस्यावर चर्चा करण्याकरिता बदलापूर-अंबरनाथ बिल्डर असोशिएशन च्या वतीने विकासक आणि वास्तुविशारद यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आ.किसन कथोरे तसेच नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यासह माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार्‍या शिबिरात शैवर्य सरदेशपांडे, मनोज थळे आणि मंगेश घाणेकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या कायद्यामुळे बांधकाम व्यावसायिकांविषयी अधिक विेशासार्हता निर्माण होणास मदत होणार आहे असा विेशास असोशिएशनचे सचिव संभाजी शिंदे यांनी व्यक्त केला आहे.