नवी मुंबईत आठपैकी सहा विभागात आधार केंद्र सुरू

नवी मुंबई,दि.३१(वार्ताहर)-नवी मुंबईतील पालिकेच्या विभाग कार्यालयात आधार कार्ड केंद्र सुरू करा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस ऐरोली विधानसभेचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी पालिका आयुक्त रामस्वामी यांच्याकडे केली होती.त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत पालिका प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारच्या महाऑनलाईनतर्फे नवी मुंबईतील ८ पैकी ६ विभाग कार्यालयात आधार कार्ड केंद्र सुरू करण्यात आली आहेत. नवी मुंबईतील बेलापूर, तुर्भे, वाशी, ऐरोली, कोपरखैरणे आणि दिघा या पालिका विभाग कार्यालयात ही आधार कार्ड केंद्र सुरू करण्यात आली असून नेरुळ घणसोली मध्ये सुद्धा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.