दर्जेदार आरोग्यसेवा; सरसकट अनुदान!

ठाणे,दि.१५(वार्ताहर)-आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणार्‍या रुग्णांनाही जागतिक दर्जाची आरोग्य सेवा किफायतशीर दरात देण्याची घोषणा आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाने जाहिर केली. अवघ्या १००
रुपयात तपासणी केली जाणारे हे ठाण्यातील पहिले खाजगी रुग्णालय ठरले आहे. सर्वांना किफायतशीर दराने दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी ज्युपिटर चॅरिटेबल इन्स्टिट्यूट (जेसीआय) सुरू केल्याची घोषणा ज्युपिटर हॉस्पिटलने केली आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे आयुक्त संजीव जैसवाल यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. विशेष वैद्यकीय व सर्जिकल मजले असलेले हे ५१ बेडचे हॉस्पिटल आहे. नव्या जेसीआय ओपीडीचीही घोषणा करण्यात आली. प्रत्येक शनिवारी, दुपारी ३ वाजल्यापासून, सर्व स्पेशालिटीजचे डॉक्टर ज्युपिटर हॉस्पिटलच्या आउट पेशंट डिपार्टमेंटमध्ये (ओपीडी) उपलब्ध असतील व कोणत्याही प्रकारच्या कन्सल्टेशनसाठी १०० रु शुल्क आकारतील. सल्ला देण्यात आलेल्या कोणत्याही तपासणीवर ३५% अनुदान दिले जाईल व डॉक्टरांनी सुचवलेल्या कोणत्याही उपचार/ सर्जरीवर ४०% अनुदान दिले जाईल. दर्जेदार आरोग्यसेवेचा पूर्ण खर्च न पडवणार्‍या कोणत्याही व्यक्तीला या सेवेचा लाभ घेता येईल. यासाठी, उपचाराचा खर्च परवडत नसल्याने जेसीआय वॉर्डमध्ये अनुदानित उपचार मिळावे, यासाठी रुग्णांना सेल्फ- डिक्लेरेशन फॉर्मवर सही करावी लागेल. या अर्जावर सही करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला या उपक्रमार्ंगत लाभ मिळवता येईल. यासंबंधी आणखी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. पालक मंत्री, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते माफक दरात आरोग्यसेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळेस एकनाथ शिंदेनी आपले मत मांडले, ‘गुणवत्ता कमी करून खर्च कमी करता येऊ शकत नाही. रुग्णाला एंड- टू-एंड उपचार पूर्ण काळजी ज्युपिटर चॅरिटेबल इन्स्टिट्यूटची एक अतुलनीय योजना आहे आणि एक उत्तम पुढाकार आहे. ठाणे महानगर पालिका आयुक्त, संजीव जयस्वाल यांनी सांगितले, आपण डॉ. अजय ठक्कर आणि ज्युपिटर हॉस्पिटलमधील संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि मला आशा आहे की ठाण्यातील आणखीन कॉर्पोरेट रुग्णालये असा कार्यक्रम राबवतील. आणि रुग्णांना जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा देतील आणि ती सर्वांसाठी सुलभ होईल यासाठी मी आणि महामंडळ कोणत्याही प्रकारे सहकार्य करण्यास तत्पर असू याचा आम्हाला आनंद आहे. ज्युपिटर हॉस्पिटलमधील कार्यकारी संचालक डॉ. अंकित ठक्कर यांनी सांगितले, आम्ही केवळ अनुदानित ओपीडी कन्सल्टेशन देत नाही, तर तपासणी व उपचार या बाबतीत सहाय्य करून रुग्णांचे निदान ते उपचार अशा प्रवासात सोबतही करतो. आज, समाजातील एक मोठा वर्ग आहे, ज्यास आरोग्याच्या समस्यांवर प्रतिष्ठेचे व परवडणारे उपाय हवे आहेत. त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये जायचे नाही व कॉर्पोरेट हॉस्पिटल परवडत नाही. आम्हाला या वर्गाला सेवा द्यायची आहे, जेणे करून त्यांना दर्जेदार सेवा सन्मानाने व स्वाभिमानाने मिळेल. उपचाराचा संपूर्ण खर्च परवडणार नाही, असे अर्ज भरताना नमूद करणारा कोणताही रुग्ण जेसीआयमध्ये अनुदान मिळण्यासाठी पात्र असेल. ज्युपिटर हॉस्पिटल व ज्युपिटर फाउंडेशन यांनी अंदाजे ११,००० रुग्णांना अनुदानित उपचार दिले आहेत. आतापर्यंत अंदाजे ५००० रुग्णांवर पूर्णत: मोफत शस्त्रक्रिया करणयात आली आहे. दरवर्षी संस्था ३०० मोफत पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक व कॉन्जेनिटल डिफॉर्मिटी करेक्शन सर्जरी, ६०० मोफत पेडियाट्रिक हार्ट सर्जरी व १२०० मोफत आय सर्जरी करते. अन्य रुग्णांना असते तीच मेडिकल टीम व आयसीयू, ऑपरेशन थिएटर व निदानविषयक पायाभूत सुविधा या सर्व रुग्णांनाही उपलब्ध असतात.