डोंबिवलीतील आगरी महोत्सवात महाराष्ट्र केरळ संस्कृती दर्शन

डोंबिवली,दि.६(वार्ताहर)-गेली १४ वर्षे आगरी महोत्सव माध्यमातून ‘आगरी संस्कृती’चा इतिहास मांडण्यात आगरी युथ ङ्गोरमने यशस्वी वाटचाल केली. पंधराव्या वर्षाच्या पदार्पणात एका अनोख्या उपक्रमाची भर घालण्यात आली असुन यावर्षी आगरी महोत्सव या उतुंग प्रदर्शनात ‘महाराष्ट्र केरळ संस्कृती दर्शन’ म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्र व केरळ या दोन वेगळी भिन्न संस्कृती व परंपरा जतन करणार्‍या राज्यांच्या संस्कृतीचे आदान प्रदान आगरी महोत्सवात बघायला मिळणार आहे. आगरी युथ ङ्गोरमच्या ‘आगरी म होत्सव’बाबत माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पाटील, रामकृष्ण पाटील, दिलीप भगत व अन्य पदाधिकारी तसेच केरलीय समाजमचे ओमेन डेव्हिड, ओ.प्रदिप, सुनील आदि उपस्थित होते. यावेळी ङ्गोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले कि, ‘महाराष्ट्र केरळ संस्कृती दर्शन’ येत्या शनिवारी (०९) पासून सुरु होऊन दररोज नऊ दिवस चालणारा ठाणे जिल्ह्यातील रसिकांसाठी एकाच ठिकाणी दोन राज्यांच्या संस्कृती व परंपरेची अनुभुती देणारा सोहळा ठरणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह खा.कपिल पाटील, ना.एकनाथ शिंदे, ना.रविंद्र चव्हाण तसेच राज्य पुरस्कार विजेती अभिनेत्री शीला, अभिनेता मधु, दिग्दर्शक अडूर गोपालकृष्ण, सुर्य कृष्णमूर्ती, एस.जी.श्रीकुमार यांच्या उपस्थितीत होणार शनिवारी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. महाराष्ट्रातील विविध परंपरा व संस्कृती दाखविणारे नृत्य नाट्य या बरोबरच केरळचे वैशिष्ट्यपूर्ण कलाप्रकार दररोज ५.३० ते ६.३० यावेळेत सादर करण्यात येणार आहेत. याचबरोबर दररोज वैविध्यपूर्ण विषायांवरील व्याख्यान व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या संत सावळाराम म्हात्रे क्रिडा संकुलात होणार्‍या या आगरी महोत्सवाच्या निमित्ताने रविवारी (१०) ५.३० वाजता ‘अवयवदान व कॅन्सर’ यावर डॉ.अनिल हेरूर यांचे व्याख्यान व सात वाजता एम. जी. श्रीकुमार यांच्या जगप्रसिध्द वाद्यवृंदाचा कार्यक्रम. सोमवारी (११) ६.३० वाजता ‘डिजीटल इकॉनॉमी’ विषयावर चंद्रशेखर ठाकूर, ज्योतीष मोहन व रामाकुमार यांचे मार्गदर्शन होणार आहे याच दिवशी करवीर पिठाचे शंकराचार्य प.पू.नृसिंह सरस्वती भारती यांचे आघमन होणार आहे. मंगळवारी (१२) ६.३० वाजता ‘आगरी समाजाची भावी वाटचाल’ यावर चर्चासत्रात रविंद्र शीसवे, ह.भ.प.जगन्नाथ माहाराज पाटील, डॉ.प्रकाश पाटील, सहभागी होणार असून दीपक म्हात्रे सुत्रसंचालन करणार आहेत. रात्री ९.३० वाजता कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (१३) ६.३० वाजता ‘स्त्रीधर्म व स्त्रियांचे प्रश्न’यावर चर्चासत्रात डॉ. नीला सत्यनारायण, डॉ.संगीता डाके सहभागी होणार असून प्राची गडकरी समन्वय साधणार आहेत. गुरुवारी (१४) रोजी ‘विकास-मराठी भाषा व साहित्याचा’ यावर चर्चासत्रात श्रीपाद जोशी, प्रकाश पायगुडे, उषा तांबे, कैसला खलीद हे सहभागी होणार असून सुरेश देशपांडे सुत्रसंचलन करणार आहेत. रात्री साडेनऊ वाजता गोविंद नाईक, शर्वरी मुनीेशर, दत्तप्रसाद जोग व सहकारी यांचा ‘गझल मुशायरा’ होणार आहे. शुक्रवारी (१५) ६.३० वाजता ‘रुणानुबंध सैनिकांशी- कारगील शौर्यगाथा ‘अनुराधा प्रभुदेसाई यांचे व्याख्यान रात्री साडेनऊ वाजता कवी संमेलन. शनिवार (१६) सात वाजता प्रसिध्द कलाकारांचे विविध कार्यक्रम रविवारी (१७) सात वाजता महाराष्ट्र व केरळ मधील विविध कलांचा आविष्कार अशी भरगच्च सांस्कृतिक मेजवानी यंदा आगरी महोत्सवात रसिकांना मिळणार आहे.