ठाणे पोलिसांची बार आणि हुक्का पार्लरवर कारवाई

ठाणे,दि.२९(वार्ताहर)-ठाणे पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री एका बार आणि मुंब्जएयातील बेकायदा हुक्का पार्लरवर छापा मारून १४ बारगर्लसह तब्बल ११२ जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई उपायुक्त सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.शहरातील सिडको बस थांब्यानाजिक असलेल्या मधुर मनीष बारमध्ये रात्री उशिरापर्यंत महिला वेटर खोट्या चलनाचा वापर करून ग्राहकांना सेवा पुरवीत असल्याचे दिसून आले. येथील शौचालयाच्या आता छुपा कमरा बनवून पाच मुलींना लपवून ठेवलेले आढळले. येथून १४ महिलांसह बार व्यवस्थापक आदी ४७ जणांना ताब्यात घेतले. तर मुंब्जएयातील चुहा ब्रिजनजीक असलेल्या ‘किंग्स फमिली एंड फ्रेंड्स धाबा’ या अवैध हुक्का पार्लरवर छापा मारून ६५ जणांवर गुन्हा दाखल केला.