जातीचा नव्हे, मातीचा अभिमान घेऊन मोठे व्हा- पंकजा मुंडे

शहापुर,दि.29(वार्ताहर)-विद्यार्थी म्हणून जातीचा नव्हे, मातीचा अभिमान घेऊन मोठे व्हा! गरीब आईबापांच्या कष्टाचं चीज करण्यासाठी शिकाफ असे भावनिक उदगार काढत महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी किन्हवलीतील शेकडो विद्यार्थ्यांना प्रेरित केले. 29 जुलै 2004 मध्ये न्हवलीसारख्या उर्गम भागात द्या प्रसारक मंडळाने सुरू केलेल्या कला,वाज्य व महाद्यालयाच्या 14 व्या वर्धापनमत्त स्व.गोपीनाथ मुंडे सभागृहात आयोसोहळ्यात त्या बोलत होत्या. नॅकचे मानांकन प्राप्त झालेल्या किन्हवली महाविद्यालयाच्या ‘डिजिटल इंडिया विद्यादीप’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन यावेळी पंकजा मुंडे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा, मुरबाडचे आमदार किसन कथोरे, आदिवासी विभागीय प्रकल्पस्तरीय समितीचे अध्यक्ष अशोक इरनक,विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद भानुशाली यांच्या हस्ते करण्यात आले. शहापूरच्या ग्रामीण भागातील रस्ते येत्या पावसाळ्यापूर्वी चकाचक करण्याचे ओशासन पंकजा मुंडे यांनी दिले.मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे तसेच नवनिर्वाचित जि.प.सदस्य राजू विशे, काशिनाथ पष्टे, कांचन साबळे,पंचायत समिती सदस्य सुभाष हरड,काशिनाथ वाघ, दिपक पवार, पुष्पाताई बांगर, शारदा रसाळ, दक्षता लकडे, यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलतांना अरविंद भानुशाली यांनी किन्हवली परिसरातील खराब रस्ते, विनाअनुदानित शाळांची दूरवस्था, प्रशासकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष या बाबींवर भाष्य करत मंत्री महोदयांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नलावडे यांनी, तर सूत्रसंचालन गोपाळ वेखंडे, लक्ष्मण उमवणे यांनी केले.